यंदा भुईकोट किल्ला व टँक म्युझीयमची सफर बंद; प्रशासनाने केले हे आव्हान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  दरवर्षी 26 जानेवारीला नागरिकांना पाहण्यासाठी खुले असलेला भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम यंदा मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यात विशेषत: अहमदनगर शहर व भिंगार कॅम्प हद्दीत करोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे 26 जानेवारीच्या दिवशी या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी येऊ नये, असे आव्हान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केले आहे.

जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार करोना बाधीत रूग्ण आढळून येत आहे. अहमदनगर शहरात दररोज तीनशे ते पाचशे रूग्ण समोर येत आहे. वाढती रूग्णसंख्या धोक्याची असल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.

भुईकोट किल्ला व टँक म्युझीयम पाहण्यासाठी खुले केल्यास त्याठिकाणी गर्दी होऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा दोन्ही ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी 26 जानेवारी रोजी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम खुले करण्यात येते मात्र यंदा ते बंद असल्याने नागरिकांची निराशा झाली आहे.