Vivo S17e Series : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात विवोचा नवीन शक्तिशाली फोन लाँच होणार आहे. कंपनीचा हा फोन 80W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. कंपनी लवकरच Vivo S17e सीरिज लाँच करू शकते.
या सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन S17e आणि S17 Pro लॉन्च करेल. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन याच महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहेत.
कंपनी हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले सह नॉक करू शकते. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर असू शकतो. स्टोरेजचा विचार केला तर Vivo S17e यात 8GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड मेमरी ऑफर करेल. हा फोन आउट-ऑफ-द-बॉक्स Android 13 OS वर काम करेल.
जाणून घ्या फीचर्स
लीक नुसार, कंपनीचा आगामी MediaTek Dimensity 7200 द्वारे समर्थित असणार आहे. जे या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केले आहे. परंतु कंपनीकडून या फोनच्या स्पेसिफिकेशनबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही.
या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात येऊ शकतो. तसेच, या फोनला उर्जा देण्यासाठी, 80W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh पॉवरफुल बॅटरी कंपनी प्रदान केली जाणार आहे. आगामी फोन 90Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले सह नॉक करेल. तसेच यात ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर असेल.