ताज्या बातम्या

Vivo Smartphone Offer : होणार हजारोंची बचत! ‘या’ फ्लॅगशिप फोनवर प्रथमच मिळतेय 31,000 रुपयांची सवलत, लगेच करा बुकिंग

Published by
Ahmednagarlive24 Office

Vivo Smartphone Offer : मागणी आणि फीचर्स भन्नाट असल्याने सर्वच स्मार्टफोनच्या किंमत गगनाला भिडल्या आहेत. अशातच जर तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण तुम्ही आता खूप स्वस्तात Vivo चे फ्लॅगशिप फोन खरेदी करू शकता. या फोनवर एक दोन नाही तर एकूण 31,000 रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. अशी संधी तुम्हाला कुठे? आणि कशी मिळत आहे? ते जाणून घ्या.

जाणून घ्या किंमत

फोटोग्राफीसाठी स्वतंत्र चिपसेटसह येणारे हे दोन्ही स्मार्टफोनची विक्री येत्या 5 मे रोजी पहिल्यांदा केली जाणार आहे. मात्र या सेलपूर्वी तुम्हाला हा फोन फ्लिपकार्ट आणि विवो इंडियाच्या ई-स्टोअर आणि रिटेल स्टोअर्सवरून प्री-बुक करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 89,999 रुपये इतकी आहे.

या स्मार्टफोनच्या खरेदीवर 8000 रुपयांची झटपट सवलत देण्यात येत आहे. तसेच तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला 8000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर मिळू शकते. त्यानंतर या फोनची किंमत 58,999 रुपये इतकी असणार आहे.

कंपनीच्या Vivo X90 Pro च्या 12GB + 256GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 84,999 रुपये इतकी आहे. तर Vivo X90 च्या 8GB + 256GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 59,999 रुपये तसेच 12GB + 256GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 63,999 रुपये इतकी आहे. तुम्ही आता हा फोन 9 महिन्यांसाठी 6,555 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता.

जाणून घ्या Vivo X90 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

Vivo X90 ची फीचर्स

डिस्प्ले: 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच AMOLED डिस्प्ले
प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 9200 चिपसेट
बॅटरी: 4870mAh
चार्जिंग सपोर्ट: 120W ड्युअल फ्लॅश चार्जिंग सपोर्ट
रॅम आणि स्टोरेज: 12GB LPDDR5 रॅम
कॅमेरा सेटअप: कंपनीच्या Vivo X90 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे, ज्यात OIS, EIS आणि LED फ्लॅशसह 50MP IMX866 प्राथमिक सेन्सर, 2x ऑप्टिकल झूमसह 12MP पोर्ट्रेट सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सर यांचा समावेश असणार आहे. इतकेच नाही तर यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 32MP स्नॅपर असणार आहे.

Vivo X90 Pro ची फीचर्स

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 9200 चिपसेट
बॅटरी: 4870mAh
चार्जिंग सपोर्ट: 120W ड्युअल फ्लॅश चार्जिंग सपोर्ट
रॅम आणि स्टोरेज: 12GB LPDDR5 रॅम

Ahmednagarlive24 Office