Vivo Smartphone Offer : विवोचा बजेट फोन 41% डिस्काउंटसह येईल करता खरेदी, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo Smartphone Offer : भारतीय बाजारात Vivo अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. यातील काही स्मार्टफोनच्या किमती जास्त असतात तर काहींच्या किमती कमी असतात. कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo Y02t फोन लाँच केला होता.

या फोनची मूळ किंमत 15.999 रुपये इतकी आहे. यावर Amazon सवलत देत आहे. या ठिकाणी हा फोन 41% डिस्काउंटसह उपलब्ध आहे.तुम्ही हा फोन 9,499 रुपयांमध्ये सवलत देऊन खरेदी करू शकता. त्याशिवाय बँक ऑफरमध्ये या फोनवर 250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळत आहे.

महत्त्वाचे म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 9,000 रुपयांपर्यंत आणखी स्वस्त होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला उत्तम फोन घरी आणायचा असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय योग्य आहे.

जाणून घ्या Vivo Y02t चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vivo Y02t च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. तसेच प्रोसेसर म्हणून तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट पाहायला मिळू शकतो.

इतकंच नाही तर फोटोग्राफीसाठी कंपनी या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेल कॅमेरा देत असून सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला ५ मेगापिक्सेलचा फ्रंट पाहायला मिळेल. इतकेच नाही तर या फोनला उर्जा देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 10-वॉट चार्जिंगला सपोर्ट करत असून OS बद्दल सांगायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करेल.

तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, USB 2.0, OTG आणि ड्युअल सिम सपोर्ट सारखे पर्याय मिळतात. 186 ग्रॅम वजनाच्या या फोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा असून हा फोन कॉस्मिक ग्रे आणि सनसेट गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करता येईल.