Vivo Smartphone : देशातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. ज्यामुळे ग्राहकांना आता हजारो रुपयांचा फायदा होणार आहे. कंपनीने आपल्या दोन शक्तिशाली स्मार्टफोनच्या किमती खूप कमी केल्या आहेत.
कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo Y100 आणि Vivo Y100A हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. जे आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. विवोचे Vivo Y100 आणि Vivo Y100A हे दोन स्मार्टफोन्स किमतीत कपात केल्यानंतर नवीन किमतीत लिस्ट केले आहेत.
ग्राहक आता ते फ्लिपकार्ट शिवाय Vivo India ई-स्टोअर आणि इतर भागीदार रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकतात. हे मॉडेल ऑफलाइन मार्केटमध्येही कमी किमतीत खरेदी करता येईल. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा सेटअप आणि रंग बदलणारा बॅक-पॅनल देण्यात आला आहे.
ऑफर
या फोनच्या किमतीचा विचार केला तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह Vivo Y100 आणि Vivo Y100A या दोन्ही प्रकारांची किंमत आता 21,999 रुपये इतकी झाली आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह फोन तुम्हाला आता 23,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. यावर आयसीआयसीआय, एसबीआय, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्ही हे स्मार्टफोन विनाखर्च EMI वर खरेदी करू शकता आणि शिवाय यावर कंपनी V-Shiel संरक्षण योजना ऑफर करत आहे.
जाणून घ्या Vivo Y100 ची खासियत
प्रीमियम डिव्हाईससह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलचा रंग बदलत असून यासाठी फ्लोराईट एजी ग्लास तंत्रज्ञान दिले आहे. या स्मार्टफोनचा रंग पॅसिफिक ब्लू आणि ट्वायलाइट गोल्ड या दोन प्रकारांय बदलतो तर फोनचा तिसरा प्रकार मेटॅलिक काळ्या रंगामध्ये येतो. हा फोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरद्वारे समर्थित असून याच्या मागील पॅनलवर 64MP OIS ट्रिपल कॅमेरा सेटअप तूम्हाला पाहायला मिळेल..
जाणून घ्या Vivo Y100A ची खासियत
या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये अँटी-शेक टेक्नॉलॉजी सपोर्टसह 64MP ट्रिपल कॅमेरा आणि पोर्ट्रेट मोड ते सुपर नाईट मोड यासारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. मागील मॉडेल प्रमाणे हा फोन पॅसिफिक ब्लू आणि ट्वायलाइट गोल्ड या दोन रंग बदलणार्या प्रकारांत विकत घेता येईल. तर फोनचा तिसरा मिडनाईट ब्लॅक प्रकार खूप कमी किमतीत उपलब्ध आहे.