Vivo Smartphones Offer :जर तुम्ही येत्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुम्ही आता विवोचे स्मार्टफोन 8,500 रुपयांपर्यंतच्या सवलतीत खरेदी करू शकता. ही ऑफर काही दिवसांसाठी असणार आहे हे लक्षात ठेवा.
तुम्ही आता स्वस्तात नवीनतम Vivo V29e, Vivo X90 सीरिज आणि Vivo Y56 स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. गणेश चतुर्थीनिमित्त Vivo ने ही अप्रतिम ऑफर आणली आहे. ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर ऑफर.
मिळेल 8,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक
आता Vivo आपल्या नवीनतम Vivo V29e, Vivo X90 सीरिज आणि Vivo Y56 स्मार्टफोन्सच्या खरेदीवर एकूण 8,500 पर्यंतचा विशेष कॅशबॅक ऑफर देत आहे. परंतु ही ऑफर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. विवोची ही शानदार ऑफर विवो ई-स्टोअर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
भारतातील Vivo चाहत्यांसाठी ही खरोखर खूप चांगली बातमी आहे ज्यांना हा स्मार्टफोन खरेदी करायचे होते परंतु त्यांच्या उच्च किमतीमुळे ते ते खरेदी करू शकले नाहीत. परंतु आता तुम्ही कॅशबॅकचा फायदा घेऊन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत हे स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यामुळे त्वरा करा आणि लवकरात लवकर या खास ऑफरचा लाभ घ्या.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर Vivo V29e च्या 8GB 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आणि 8GB 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये इतकी आहे. तर Vivo X90 बद्दल सांगायचे झाले तर त्याच्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये इतकी आहे.
फोनचा 12GB रॅम 256GB स्टोरेज व्हेरिएंट 63,999 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की Vivo X90 Pro फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये खरेदी करता येईल. या फोनच्या दिग्गज ब्लॅक कलर व्हेरिएंटची किंमत 84,999 रुपये इतकी आहे. तसेच Vivo Y56 5G ची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये इतकी आहे.