Vivo Y35m : विवो करणार धमाका! लवकरच बाजारात येणार खिशाला परवडणारा स्मार्टफोन

Vivo Y35m : भारतीय बाजारात विवोचे नाव खूप प्रसिद्ध आहे. कारण ही कंपनी सतत दमदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. त्याशिवाय या स्मार्टफोनच्या किमतीही खूप कमी असतात.

ग्राहकांना स्वस्तात चांगले स्पेसिफिकेशन मिळते. अशातच कंपनी आता मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच Vivo Y35m हा स्मार्टफोन लाँच करू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ग्राहकांना आकर्षित करणे हा कंपनीचा एकमेव उद्देश आहे. कंपनीचा मॉडेल नंबर V2230A सह नवीन स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसला आहे.

या स्मार्टफोनचे नाव Vivo Y35m असून लवकरच तो बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, फोटो आणि किंमत यासारखी काही माहिती समोर आली आहे. परंतु, अद्यापही कंपनीने कोणताच खुलासा केला नाही.

अपेक्षित स्पेसिफिकेशन

या नवीन स्मार्टफोन मध्ये कांपनी 720 x 1600 पिक्सेलच्या HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन Dimensity 700 chipset वर काम करेल.

स्टोरेजचा विचार करायचा झाला तर Android 13 OS वर चालणाऱ्या या फोनला 8GB पर्यंत रॅम आणि 256 पर्यंत स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनचे चार व्हेरिएंट ऑफर केले जातील तर, त्याचे 5 रंग पर्याय उपलब्ध असू शकतात.

किंमत

  • 4GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत $215 म्हणजे 17,797 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.
  • 6GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत $230 म्हणजेच 19,041 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.
  • 8GB + 128GB स्टोरेजची किंमत 243 डॉलर म्हणजेच 20,117 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.
  • 8GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत $258 म्हणजेच 21,359 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा आणि बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये ग्राहकांना 5000mAh बॅटरी मिळेल, जी 18W फास्ट चार्जिंग स्पीडसह असणार आहे. तसेच ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 13MP आणि दुय्यम कॅमेरा 2MP असेल. त्याशिवाय सुरक्षेसाठी साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असू शकतो.