ताज्या बातम्या

Vivo X90 Series : अप्रतिम ऑफर! Vivo X90 सीरीजवर मिळत आहे हजारो रुपयांचा कॅशबॅक, अवघ्या 2500 रुपयात खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Published by
Ahmednagarlive24 Office

Vivo X90 Series : सध्या शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच होत आहेत. त्यामुळे जर तुमचे बजेट जास्त नसेल आणि तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

कारण आता तुम्हाला Vivo X90 सीरीजवर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तुम्ही तो महिन्याला फक्त 2,500 रुपये देऊन EMI वर खरेदी करू शकता. या सीरिजमध्ये Vivo X90 आणि Vivo X90 Pro या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.

कंपनीकडून असे जाहीर करण्यात आले आहे की त्याची नवीनतम फ्लॅगशिप लाइनअप आता 24 महिन्यांपर्यंत शून्य डाऊन पेमेंट किंवा नो-कॉस्ट EMI सह खरेदी करू शकता. यासाठी ग्राहकांना फक्त 2,500 रुपये मोजावे लागणार आहेत. हा लाभ ग्राहकांना बँका आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीएफसी, कोटक आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या वित्त भागीदारांद्वारे देण्यात येत आहे.

मिळत आहे कॅशबॅक आणि सवलत

विवो X90 लाइनअपच्या दोन्ही फोनवर नो-कॉस्ट ईएमआय पर्याय मिळत आहे परंतु शिवाय, इतर ऑफर मिळत असून जर तुम्ही एसबीआय, आयसीआयसीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डच्या मदतीने पैसे भरत असाल तर तुम्हाला 6,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

त्याच वेळी, जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला 8,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ मिळेल. हा फोन तुम्ही व्हेगन लेदर फिनिश आणि लीडरशिप ब्लॅक कलरसह खरेदी करू शकता. स्टोरेजचा विचार केला तर Vivo X90 Pro ची 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या एकमेव मॉडेलची किंमत 84,999 रुपये इतकी आहे.

जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला त्याचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह 59,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 63,999 रुपये आहे. तुम्हाला हे मॉडेल ब्रीझ ब्लू आणि अॅस्ट्रॉइड ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. तुम्ही हा फोन विवो ई-स्टोअर शिवाय फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

कॅमेरा

या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 1-इंचाचा Sony IMX989 मुख्य कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो Zeiss ने ऑप्टिमाइझ केला आहे. या युनिटमध्ये सोनी IMX758 सेन्सरसह OIS सपोर्टसह 50MP पोर्ट्रेट कॅमेरा कंपनीकडून दिला जात आहे.

तसेच Vivo X90 मध्ये IMX866 सेन्सरसह 50MP VCS ट्रू कलर मुख्य कॅमेरा, 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. इतकेच नाही तर प्रो इमेजिंग चिप V2 दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दिली आहे. यात MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office