Vivo S16 Series : अखेर लाँच झाली Vivo ची शानदार सीरिज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo S16 Series : विवो ही स्मार्टफोन कंपनी सतत नवनवीन फीचर्स असणारे आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच कंपनीने Vivo S16 सीरिज लाँच केली आहे.

यामध्ये कंपनीने पॉवरफुल बॅटरी दिली आहे. कंपनीच्या इतर स्मार्टफोनप्रमाणे याही स्मार्टफोनला भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असेल.जाणून घेऊयात या स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सची माहिती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फीचर्स

कंपनीच्या Vivo S16 या मॉडेलमध्ये 6.78-इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशो स्क्रीन, HDR10 तर 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट दिला आहे.

त्याचबरोबर Vivo S16 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 4nm प्रोसेसर त्याशिवाय Mali-G610 MC6 GPU, 12GB RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेजसह जोडलेले असताना, व्हॅनिला Vivo S16 स्नॅपड्रॅगन 870 Mobile 7nm Adregon 870 द्वारे समर्थित आहे.

स्टोरेजबाबत बोलायचे झाले तर यामध्ये कंपनीने 12GB रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 13-आधारित OriginOS कस्टम स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स बूट करते. तर सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे.

त्याचबरोबर स्टिरीओ स्पीकर, हाय-रिस ऑडिओ आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. कंपनीने ग्राहकांसाठी Vivo S16e मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेशो, HDR10 आणि 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.62-इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले दिलेला आहे. माली-G78 MP10 GPU, 12GB RAM आणि 256GB UFS 3.1 अंतर्गत स्टोरेजसह Exynos 1080 5nm प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

Vivo S16 किंमत

8GB 128GB मॉडेलसाठी या स्मार्टफोनसाठी RMB 2499 (अंदाजे रु 29,700) मोजावे लागतील तर, 8GB 256GB व्हेरिएंटसाठी RMB 2699 (अंदाजे रु. 32,000) 12GB 256GB व्हेरिएंटसाठी 35,600 रुपये आणि RMB 3,299 आहे.

Vivo S16 Pro किंमत

या स्मार्टफोनची किंमत 12GB 256GB मॉडेलसाठी RMB 3,299 अंदाजे ₹ 39,200 तर 12GB 512GB मॉडेलसाठी RMB 3,599 अंदाजे 42,700 रुपये इतकी आहे.

रंग पर्याय

Vivo S16 हा काळा, हिरवा आणि ग्रेडियंट रंगांमध्ये येतो त्याचबरोबर Vivo S16 Pro काळा आणि हिरव्या रंगात उपलब्ध असेल.