Vivo Y73t Smartphone : लवकरच लाँच होणार विवोचा बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo Y73t Smartphone : विवो आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. त्यामुळे भारतीय बाजारात विवोच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

जर तुम्ही विवोचा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतात Vivo Y73t हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. विवोचा हा स्मार्टफोन तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे.

या दिवशी होणार लाँच

सप्टेंबर 2022 रोजी Vivo चा Y73T हा स्मार्टफोन चीन मध्ये लाँच झाला होता. डिसेंबरच्या शेवटी हा फोन भारतात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हा फोन भारतात दुसऱ्या नावानेही लॉन्च केला जाऊ शकतो.परंतु , कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक आणि 2MP मॅक्रो लेन्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप ग्राहकांना मिळेल. फोनच्या पुढील भागात 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल तर याला 6000mAh बॅटरी मिळेल, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह असेल.

स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y73t मध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट उपलब्ध असेल. 6.58-इंचाचा डिस्प्ले असून ज्याला 60hz चा रिफ्रेश दर आणि 2408×1080 पिक्सेलचे रिझोल्यूशन मिळेल. तसेच यामध्ये,1TB पर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी याला microSD स्लॉट मिळेल.

किंमत

हा स्मार्टफोन चीनमध्ये तीन प्रकारांसह सादर करण्यात आला होता. त्याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 1,399 युआन (अंदाजे रु. 15,827) तर 8GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 1,599 युआन (अंदाजे रु. 18,000) आणि 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 1799 युआन (रु. 2030) इतकी आहे. भारतात या फोनची किंमत 20 हजार रुपये इतकी असू शकते.