Vivo Y02 : जबरदस्त बॅटरीसह विवोचा नवीन स्मार्टफोन लाँच, 8 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार

Vivo Y02 : जर तुम्ही Vivo चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने इंडोनेशियामध्ये Vivo Y02 हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारातही लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना हा स्मार्टफोन 8 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लवकरच कंपनीचा Vivo Y02 हा नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स ग्राहकांना मिळतील. अनेक दिवसांपासून कंपनी या स्मार्टफोनवर काम करत आहे.

स्पेसिफिकेशन

Vivo Y02 स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम ,वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळणार असून डिस्प्लेचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे . त्याचबरोबर आस्पेक्ट रेशो 20:9 आहे.

फोनला पॉवरिंग एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, त्याशिवाय Vivo Y02 मध्ये चार वर्षे जुना MediaTek Helio P22 चिपसेट वापरले आहे. स्टोरेजचा विचार केला तर 2GB किंवा 3GB RAM आणि 32GB स्टोरेज आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

ग्राहकांना यामध्ये समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल, तर मागील बाजूस, राउंड कॅमेरा बेटावर LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. फोनला 5000mAh बॅटरीचा पाठिंबा आहे जो MicroUSB 2.0 पोर्ट वापरून 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.

फीचर्स

Vivo Y02 हा Android 12 (Go edition) वर चालतो, म्हणजेच तुम्हाला यामध्ये Gmail Go, YouTube Go आणि Maps Go सारखे अॅप्स मिळतील. कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर, फोन 4G VoLTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, GPS आणि 3.5mm जॅकसह येतो. परंतु, ग्राहकांना फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही, पण फेस अनलॉक फीचर आहे.

किंमत

जर किंमतीबद्दल सांगायचे झाले तर या स्मार्टफोनची किंमत इंडोनेशियामध्ये IDR 1,499,000 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. म्हणजे सुमारे 7,800 रुपये आहे. हा फोन ऑर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे या कलरमध्ये येतो.

विवोचा नवीन स्मार्टफोन ग्राहकांना 8 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हि एक चांगली संधी आहे. ज्यांना कमी किमतीत चांगला स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर ही संधी गमावू नका.