Vivo Smartphone : Vivo च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नवीन वर्षात कंपनीचा एक जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनीने मागील महिन्यात Vivo X90 सीरीज चीनमध्ये लाँच केली आहे.
अशातच आता हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत आणि भारतात लाँच होणार आहे.या सीरिजमध्ये Vivo X90, X90 Pro आणि X90 Pro+.हे स्मार्टफोन असणार आहेत. परंत्तू, लाँचपूर्वी X90 Pro हा स्मार्टफोन बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर दिसून आला आहे.
या स्मार्टफोनला गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टिंगमध्ये 1376 पॉइंट्स आणि मल्टी कोर टेस्टिंगमध्ये 4327 पॉइंट मिळालेले आहेत. यादीनुसार, हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येईल.
कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन Android 13 OS ने सुसज्ज असणार आहे. WPC डेटाबेसमध्ये फोनचे रेंडर असून यामध्ये फोनची संपूर्ण रचना पाहता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोन 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
विवो X90 प्रो फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये, कंपनी 2800×1260 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देत असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा प्रीमियम हँडसेट 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Dimensity 9200 चिपसेट देत आहे.
या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला फोटोग्राफीसाठी तीन कॅमेरे दिले आहेत. यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सरसह 500-मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनची बॅटरी 4870mAh असून ती 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 13 वर आधारित Origin OS वर काम करतो. तसेच कंपनी कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स देत आहे.