Vodafone Idea : Vodafone Idea चे अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लोकप्रिय आहेत. त्यात ही कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणि नवनवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक भन्नाट रिचार्ज प्लॅन सादर करत असते.
कंपनी आपले सर्व रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या बजेटचा विचार करून लाँच करत असतात. अशातच आता कंपनीने गुपचूप प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या प्लॅनसाठी फक्त 6 रुपये मोजावे लागणार आहेत. जाणून घेऊयात कंपनीच्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात.
जाणून घ्या प्लॅनचे फायदे
Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत 181 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा प्लॅन एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच या प्लॅनची रोजची किंमत 6 रुपये असणार आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना संपूर्ण वैधतेसाठी दररोज 1GB डेटा उपलब्ध करून दिला जात आहे.
हे लक्षात घ्या की तुमचा एकदा 1GB डेटा संपला की तो दिवसाच्या शेवटी रीसेट होतो. जर तुम्ही खूप मोबाईल डेटा वापरत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा आहे. कंपनीने अजून 5G लाँच केला नाही त्यामुळे, हा प्लॅन तुम्हाला फक्त 4G डेटा अनुभव देणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा एक डेटा प्लॅन आहे, त्यामुळे यात कॉलिंगचा कोणताही लाभ मिळत नाही.
जर तुम्हाला 5G हवे असल्यास तुम्ही Airtel आणि Jio चे प्लॅन पाहू शकता. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे हा एअरटेलच्या 181 रुपयांच्या प्लानची हुबेहुब कॉपी असणार आहे. कंपनीने एक प्रीपेड प्लॅन आणला असून जो Airtel च्या प्लान प्रमाणेच फायदे देत आहे.
Vi संपूर्ण भारतात 5G नेटवर्क सेवा सुरू करू शकेल. टेल्को आता 22 महिन्यांपासून सदस्य गमावत असून जर परिस्थिती लवकरच बदलली गेली नाही तर, येत्या काही महिन्यांत तिची सक्रिय सदस्य संख्या 200 दशलक्षच्या खाली जाईल.