Airtel आणि Jioला टक्कर देण्यासाठी Vodafone Ideaने लाँच केले 4 जबरदस्त प्लॅन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  Tariff Plans च्या किमती वाढवल्या मुळे व्होडाफोन-आयडियाचे युजर्स नाराज झाले आहेत. आता कंपनी त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच आपल्या युजर्सला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे.(Vodafone Idea Plan) 

कंपनीने आपल्या युजर्ससाठी एकाच वेळी चार नवीन धमाकेदार प्लॅनबाजारात आणले आहेत. या प्लॅनच्या किमती 155 रुपये, 239 रुपये, 666 रुपये आणि 699 रुपये आहेत. या प्लॅन्ससह युजर्संना डेटासह अनेक विशेष फायदे देखील मिळतील. या प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

155 रुपयांचा प्लॅन हा प्लॅन :- 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजर्सना 1GB डेटाची सुविधा दिली जात आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही लाऊ तुम्ही घेऊ शकता. इतकेच नाही तर प्लॅनमध्ये 300 एसएमएस पूर्णपणे मोफत देण्यात आले आहेत.

239 रुपयांचा प्लॅन :- या प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. यूजर्सना दररोज 1GB डेटा मिळेल. यासोबतच दररोज 100 एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

666 रुपयांचा प्लॅन :- 666 रुपयांचा प्लॅन 77 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज 1.5GB डेटा मिळेल. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेता येतो.

699 रुपयांचा प्लॅन :- या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळत आहे आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. यासह वापरकर्त्यांना Vi Movies आणि TV वर मोफत प्रवेश मिळेल.

Ahmednagarlive24 Office