Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Vodafone Idea : अप्रतिम प्लॅन!! ‘ही’ कंपनी देत आहे 48GB डेटासह डिस्ने + हॉटस्टार मोफत, किंमत आहे फक्त…

आपल्या ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्या सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. असाच एक प्लॅन लोकप्रिय कंपनीने ऑफर केला आहे.

Vodafone Idea : सरकारी तसेच खासगी टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत शानदार प्लॅन ऑफर करत असते. असाच एक रिचार्ज प्लॅन आता Vodafone-Idea या लोकप्रिय खासगी टेलिकॉम कंपनीने ग्राहकांसाठी आणला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना 48GB डेटासह डिस्ने + हॉटस्टार मोफत देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना एका वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शनचा लाभ घेण्यात येणार आहे. जर तुम्ही चांगला प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

कंपनी या प्लॅनमध्ये अनेक भन्नाट अतिरिक्त फायदे देत असून यात डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे एका वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. कंपनीचा हा प्लॅन Binge ऑल नाईट लाभ देत आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना आता रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित डेटाचा लाभ घेता येईल. यासाठी कंपनी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. इतकेच नाही तर कंपनी वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स ऑफर करत आहे.

मोफत मिळत आहे 48 जीबी डेटा

कंपनी प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता देत असून यात तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 जीबी डेटा देत आहे. यामध्ये तुम्हाला 48 GB अतिरिक्त डेटाही मोफत देण्यात येत आहे. कंपनीचा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग लाभांसह येत असून कंपनी तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देत आहे. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला Disney + Hotstar चे एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. कंपनीच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असणारे उर्वरित फायदे 601 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत.