ताज्या बातम्या

Volkswagen ने आणली नवीन SUV, किंमत थोडीच पण फीचर्स व स्पेसिफिकेशन्स आहेत जबरदस्त

Published by
Ahmednagarlive24 Office

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition : फोक्सवॅगनने आपल्या एसयूव्ही कॅटेगिरीत एका नवीन स्पेशल एडिशनची भर घातली आहे. या नवीन SUV चे नाव Taigun GT Edge Trail Edition असे आहे. याची एक्स शोरूम किंमत 16.3 लाख रुपये आहे.

हे टॉप-एंड जीटी ट्रिमवर आधारित आहे. या एसयूव्हीचे मर्यादित युनिटच उपलब्ध असतील. ही नवीन एसयूव्ही आता मार्केटमधील Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Kia Seltos, Toyota Hyryder व Honda Elevate या कारची स्पर्धा करेल.

फोक्सवॅगन तायगुन जीटी एज ट्रेल एडिशन स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत अनेक स्पोर्टी अपडेट्ससह येते. यात ब्लॅक 17 इंचाचे अलॉय व्हील आणि रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर देण्यात आले आहेत. याशिवाय या स्पेशल एडिशनमध्ये फंक्शनल रूफ आहे. ही एसयूव्ही कँडी व्हाईट, कार्बन स्टील ग्रे आणि रिफ्लेक्स सिल्वर या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

तैगुन जीटी एज ट्रेल एडिशनच्या केबिनमध्ये कॉन्ट्रास्ट रेड स्टिचिंग आणि ‘ट्रेल’ एम्बॉसिंगसह ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री आहे. यात रेकॉर्डरसह डॅशकॅम आणि 2-इंच बिल्ट-इन IPS LCD डिस्प्ले आहे.

याशिवाय 10-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, रियर कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प आहेत.

यात रेग्युलर मॉडेलपेक्षा कमी फीचर्स देण्यात आले आहेत, जसे की पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सनरूफ, वेंटिलेटड आणि पॉवर फ्रंट सीट, क्रूझ कंट्रोल, 6 एअरबॅग आणि संपूर्ण एलईडी हेडलॅम्प आदी. यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 150 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते. हे लिमिटेड व्हर्जन फक्त 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह उपलब्ध आहे.

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition चे इंजिन
Taigun जीटी एज ट्रेल एडिशनमध्ये 1.5 लीटर, टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन Taigunच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 148bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स गियरबॉक्स चा पर्याय आहे. या कारमध्ये विविध प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत.

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition ची किंमत
Volkswagen Taigun GT Edge Trail Edition ची किंमत 16.29 लाख रुपये आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office