प्रवासात उल्ट्यांचा त्रास होत असेल तर ही माहिती वाचाच ! परत कधीच नाही होणार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Vomiting Tips Marathi : रेल्वे, विमान, कार आणि बसमधून प्रवास करताना उल्टी किंवा चक्कर येते. त्यामुळे फिरायला जाताना लोक अनेक प्रकारची औषधे सोबत ठेवतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यामुळे तुम्हाला प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही.

हवा येणाऱ्या ठिकाणी बसून प्रवास करावा-
जर तुम्हाला प्रवास करताना उल्टी येत असले. तर तुम्ही खिडकी असलेल्या सिटवर बसावे. खिडकीच्या दिशेने तोंड करून बसल्याने तुम्हाला उल्टीचा त्रास होणार नाही.

गाणी ऐकण्यात किंवा गप्पा मारण्यात मन रमवा-

प्रवास करताना जर त्रास होत असेल तर गाणी ऐकण्यात किंवा गप्पा मारण्यात मन रमवावे. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास जाणवणार नाही.

प्रेशर पॉइंट दाबा-

जर तुम्हाला उल्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही आपल्या शरीराचे प्रेशर पॉइंट्स आतल्या बाजूला दाबा. यासाठी तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनीने तुमचे डावे मनगट आतल्या बाजूस दाबावेत.

झोप पूर्ण करा-

प्रवासाला जाताना नेहमी झोप पूर्ण करूनच घरातून निघा. झोप पूर्ण न झाल्याने देखील तुम्हाला प्रवासात अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24