Voter Id Update: मतदार कार्डवरील नाव,पत्ता अपडेट करायचा आहे तर वापरा ही पद्धत! घरबसल्या करा या स्टेप फॉलो

Published by
Ajay Patil

Voter Id Update:- नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या असून सात टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत.तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत.

त्यामुळे आता कालपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाकरिता उमेदवारांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकंदरीत आता संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्या अनुषंगाने देशातील 18 वर्षे पूर्ण झालेले प्रत्येक नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देखील सज्ज झालेले आहेत. परंतु यामध्ये आपल्याला माहित आहे की, मतदानाचा हक्क बजाण्याकरिता तुमच्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे.

ते नसेल तर मात्र तुम्हाला मतदानाचा हक्क बजावताना समस्या येऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मतदान कार्डवर तुमची जन्मतारीख किंवा प्रोफाइल फोटो, नाव तसेच संपूर्ण पत्ता इत्यादी गोष्टी नमूद केलेल्या असतात.

त्यामुळे ओळखीचा पुरावा म्हणून मतदानाकरिता मतदार कार्ड आवश्यक आहे. परंतु बऱ्याचदा मतदान कार्डवरील जी काही माहिती असते त्यामध्ये काही चूक होते व त्याकरिता मतदान कार्ड अपडेट करणे गरजेचे असते.

मुळे तुम्हाला देखील मतदानाच्या आधी मतदान कार्डावर काही चूक झाली असेल तर ती अपडेट करावी लागणार आहे. याकरिता कुठेही जाण्याची गरज नसून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून मतदान कार्ड अपडेट करू शकणार आहात.

 या स्टेप फॉलो करा आणि मतदान कार्ड अपडेट करा

1- जर तुम्हाला मतदान ओळखपत्रातील नाव किंवा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.

2- या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्राचा क्रमांक आणि तुमची जन्मतारीख टाकावी लागेल.

3- त्यानंतर लॉगिन करून लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला पुढील नोंदी सुधारण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4- या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय मिळतील. एक म्हणजे नावात आणि पत्त्यात सुधारणा असेल.

5- तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करायचे आहे तर त्यावर क्लिक करावे.

6- त्यानंतर पुढील काही स्टेपमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल व तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.

7- तसेच फॉर्ममध्ये दिलेली माहितीची पडताळणी करता यावी याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्र सबमिट करावे लागतील.

8- यामध्ये जर तुम्हाला नाव अपडेट करायचे असेल तर त्याकरिता आधार कार्ड, पासपोर्ट तसेच ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड देणे गरजेचे आहे.

9- समजा तुम्हाला ऍड्रेस अपडेट करायचा असेल तर तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड तसेच विज बिल किंवा टेलिफोन बिलचा वापर करू शकतात.

10- यामध्ये शेवटच्या स्टेप्स करिता सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करून तुम्हाला रिक्वेस्ट नंबर दिला जातो.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मतदान कार्ड अपडेट करू शकतात.

Ajay Patil