आरोग्य सुधारण्यासाठी आजकाल प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचे फॅड वाढले आहे. विशेषतः जे लोक जिममध्ये जातात, बॉडी बिल्डिंग करतात, ते याचा वापर जास्त प्रमाणात करतात. स्नायू बळकट होण्यासाठी व पिळदार शरीर लवकर तयार होण्यासाठी प्रोटीन सप्लीमेंट मदत करतात, असा त्यांचा समज असतो. परंतु, प्रोटीन सप्लिमेंट्सचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे काही अभ्यासातून असे दिसून आले आहे.
प्रोटीनचा वापर धोकादायक
ज्या तरुणांना लगेच बाँडी तयार करायची, ज्यांना लगेच सिक्स पॅक तयार करायचेत, त्या मुलांमध्ये प्रोटीन सप्लिमेंट घेण्याचे फॅड वाढले आहे. परंतु असे केल्याने भविष्यात गंभीर आजार होतात, अशा केसेसही पुढे आल्या आहेत. अनेक डायडिशीयन प्रोटीन सप्लिमेंट धोकादायक असल्याचे सांगत आहेत. प्रोटीन सप्लिमेंटमुळे भविष्यात अनेक गंभीर आजार होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रोटीन सप्लीमेंटमुळे खालील पाच आजारांचा धोका वाढतो.

1. मूत्रपिंडाच्या समस्या
आपल्या शरीरातील मूत्रपिंडाचे काम रक्त शुद्ध करणे आहे. जेव्हा आपण जास्त प्रथिने घेतो तेव्हा मूत्रपिंडांवर ते पचवण्यासाठी आणि शरीरातून बाहेर काढण्यासाठी जास्त दबाव येतो. जर हे दीर्घकाळ चालू राहिले तर मूत्रपिंड कमकुवत होऊ शकतात आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.
2. यकृतावर वाईट परिणाम
प्रथिने पचवण्यासाठी यकृतालाही जास्त काम करावे लागते. प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये यकृतासाठी हानिकारक असे अनेक घटक असू शकतात. जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्याने यकृताला सूज येऊ शकते आणि ते योग्यरित्या कार्य करणे थांबवू शकते.
3. पचनाच्या समस्या
प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये फायबर कमी असते. आपल्या पचनासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.
4. हाडांची कमजोरी
काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की जास्त प्रथिने सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो.
5. हृदयरोगाचा धोका
काही संशोधनातून असे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात प्रथिनेयुक्त पूरक आहार घेतल्याने शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. वाढलेले कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगांचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.