ताज्या बातम्या

“ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट”

Published by
Renuka Pawar

मुंबई : आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच भाजपने (BJP) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचावरून (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या नेतृत्वात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुनगंटीवार यांनी ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट असे म्हणत शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, इंग्रजांची वृत्ती ही सोशन करण्याची होती. पण काही लोक चले गये आणि काही लोक राहिले आहेत. ऑलिम्पिकमध्ये अनेकजण अनेक पदकं जिंकत असतात.

भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिकमध्ये शिवसेनेला गोल्ड मेडल मिळेल. बीएमसीच्या इमारतीत अशी फाईल दाखवा ज्या फाईलमध्ये पैसे खाल्ले गेले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती पण आताची शिवसेना ही नोटांवर चालले.

मी शिवसैनिकांना आवाहन करतो बाळासाहेबांची 24 कॅरेटची शिवसेना संपली आहे. आता शिवसेना काँग्रेसच्या विचारांनी पुढे जातेय अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबईत भ्रष्टाचाराशिवाय काही सुरु आहे का? पेंग्विन, रस्ते काय काय चाललंय. पालिकेचं बजेट कुणाच्या बापाचं नाही. यह पेंग्विनवालोंका पैसा नहीं है. असा कोणता विषय नाही ज्यात सरकारनं पैसे खाल्ले नाहीत.

मुंबईच्या रस्त्यांवर गाडी सायलेंट मोडवर चालत नाही तर व्हायब्रंट मोडवर चालते. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड ….पण कधी दार उघडलं नाहीच. तसंच फाईलींचं आहे.

पैसै दिल्याशिवाय फाईल वर जातच नाही, असा आरोपही मुनगंटीवार यांनी केलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची दोस्ती नाही. भविष्यात यांच्याशी दोस्ती होणार नाही असा दावाही मुनगंटीवार यांनी केला आहे.

अतुल भातखळकर यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आम्ही कुणाला छेडणार नाही. पण आम्हाला जर कुणी छेडलं नाही तर आम्ही सोडणार नाही.

आम्हाला लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही निवडून दिलं आहे. आम्ही प्रश्न मांडत राहणार. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरु आहे असे भातखळकर म्हणाले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar