अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- क्रेडिट कार्ड म्हणजे काय? हा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. ही संकल्पना आता काही नवीन राहिलेली नाही. पण, क्रेडिट कार्डचे कामकाज कसे चालते, त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे.
वाढत्या खर्चातही क्रेडिट कार्ड हा उत्तम पर्याय आहे, ज्यानं आपल्याला उधारीवर काहीही घेता येते. त्याऐवजी रोखीच्या कमतरतेमध्ये मोकळेपणाने खर्च करण्याची संधी देखील मिळते. परंतु, जेव्हा आपल्याला मोठ्या रकमेची आवश्यकता असते, तेव्हा कर्ज हा एक उत्तम पर्याय असतो.
अनेकांना क्रेडिट कार्ड घ्यायची इच्छा असूनही बँकेचे नियम आणि अटींमुळे ते मिळत नाही. अशा लोकांसाठी आता एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तुम्ही एखाद्या बँकेतून कर्ज घेतल्यानंतर त्याच बँकेतून तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते.
विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड – काही बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. स्टुडंट क्रेडिट कार्डचे तीन प्रकार असतात.
एक ज्या विद्यार्थ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे Add On Card, यामध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्याला क्रेडिट कार्ड मिळते. तर तिसरा प्रकार म्हणजे तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीवर क्रेडिट कार्ड दिले जाते.
क्रेडिट कार्डाची लिमीट किती? बहुतांश स्टुडंट क्रेडिट कार्डाची लिमीट 15 हजारापर्यंत असते. हे क्रेडिट कार्ड पाच वर्षांसाठी वैध असते.
मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला की रेग्युलर क्रेडिट कार्ड वापरेल, या हिशेबाने कार्डाची वैधता कमी ठेवली जाते. या कार्डावरून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शॉपिंग करता येते.
फिक्स डिपॉझिटवर क्रेडिट कार्ड – तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जेवढे पैसे गुंतवले असतील त्या रक्कमेच्या 75 ते 80 टक्क्यांची क्रेडिट लिमीट असलेले कार्ड तुम्हाला मिळू शकते. अशाप्रकारे क्रेडिट कार्ड मिळवल्यास ते सिक्योर्ड कार्ड असते.
याचा अर्थ बँकेने तुमच्या नावे क्रेडिट कार्ड जारी केल्यानंतर तुमच्या मुदत ठेवीचे पैसे त्यासाठी तारण किंवा हमीच्या स्वरुपात राहतील. त्यामुळे तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जितके जास्त पैसे असतील तेवढी तुमची क्रेडिट लिमीट असेल.
क्रेडिट कार्ड वर कर्ज घेताना ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवा – प्रक्रिया शुल्क माहीत असणे आवश्यक : क्रेडिट कार्ड कर्ज घेताना कृपया प्रक्रिया फी जाणून घ्या. प्रक्रिया शुल्क सामान्यत: 1-5 टक्क्यांपर्यंत असते. परंतु, आपण किती काळ कर्ज घेत आहात यावर सर्व अवलंबून आहे.
तसेच क्रेडिट कार्डची वैधता किती काळ आहे? सामान्यत: कर्ज फक्त 24 महिन्यांसाठी म्हणजेच दोन वर्षांसाठी दिले जाते. तसेच प्री-क्लोजरची सुविधा देखील आहे.
-वेळेवर बिल भरण्यास विसरू नका : क्रेडिट कार्ड कर्जे पूर्व मंजूर असतात. परंतु, कंपनी किंवा बँक आपले रेकॉर्ड कसे आहे, याची तपासणी करते. क्रेडिट कार्डवर कर्ज मिळविण्यासाठी आपली परतफेडची पत चांगली असणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरल्यावर रेकॉर्ड राखला जातो आणि कर्जाला सहज मान्यता दिली जाते.
– कर्जाची वेळेवर परतफेड करत रहा : आपण क्रेडिट कार्ड कर्ज घेतले असल्यास, आपण घेतलेल्या कालावधीच्या आत कर्जाची परतफेड करा. असे केल्याने कोणत्याही वेळी कर्ज घेण्याची संधी खुली होईल. तसेच टॉप-अप कर्ज मिळण्याची शक्यताही पूर्ण होईल.