Best Upcoming Smart TV 2023 : स्मार्ट टीव्ही घ्यायचाय? थोडं थांबा, लवकरच लाँच होणार जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Upcoming Smart TV 2023 : प्रत्येक घरांमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही दिसत असतील. स्मार्टफोन प्रमाणेच मार्केटमध्ये सतत एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही लाँच होत असतात.

नवीन वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही बाकी आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा कारण पुढच्या वर्षी नवीन स्मार्ट टीव्ही लाँच होणार आहेत. पाहुयात लिस्ट.

Xiaomi Redmi X Pro 65 इंच

Xiaomi चा हा Android स्मार्ट टीव्ही आहे. याचे मॉडेल क्रमांक Xiaomi Redmi X65 65-inch LED Ultra HD 4K हे आहे. यामध्ये ग्राहकांसाठी एलईडी डिस्प्ले दिला असून रिझोल्यूशन 4K, 3840 x 2160 Pixels आहे. याची स्क्रीन साईज 65 इंच इतकी असून आस्पेक्ट रेशो 16:09 आहे. स्मार्ट टीव्ही क्वाड कोअर प्रोसेसरने सुसज्ज आहे.

तर याचे एकूण स्पीकर आउटपुट 50 W आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट आहेत. यावर 1 वर्षाची वॉरंटी मिळती. Xiaomi Redmi 65 इंच एलईडी अल्ट्रा HD 4K स्मार्ट टीव्ही स्मार्ट टीव्हीची भारतातील किंमत सुमारे 49000 रुपये इतकी आहे.

OnePlus TV Y1S Pro 55 इंच

भारतीय मार्केटमध्ये लवकरच OnePlus TV 55 Y1S Pro लाँच होईल. यामध्ये कंपनीने HDR10+ आणि MEMC सपोर्टसह 4K पॅनेल दिला आहे. तर स्क्रीन 24W स्पीकर्ससह जोडली जाईल.

डिव्हाइस YouTube, Netflix, प्राइम व्हिडिओ आणि अधिक सारख्या प्रमुख स्ट्रीमिंग सेवांसह ग्राहकांना मिळणार आहे. या 55-इंच TV ची किंमत सुमारे 40,000 रुपये इतकी असणार आहे. यामागचे कारण म्हणजे 43-इंच आणि 50-इंच मॉडेलची किंमत 29,999 आणि 32,999 रुपये इतकी आहे.

सॅमसंग द वॉल लक्झरी 292 इंच अल्ट्रा एचडी 8k स्मार्ट मायक्रोलेड-टीव्ही

हादेखील सॅमसंगचा Android स्मार्ट टीव्ही असून त्याचे मॉडेल क्रमांक Samsung TheWall Luxury 292-inch Ultra HD 8K स्मार्ट मायक्रो एलईडी टीव्ही आहे. यामध्ये QLED डिस्प्ले असून त्याची स्क्रीन आकार 292 इंच आहे. टीव्हीच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 4K, 7680 x 4320 Pixels आहे.

स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 16:09 आहे. स्मार्ट टीव्ही क्वाड कोअर प्रोसेसरने सुसज्ज आहे. या टीव्हीचे एकूण स्पीकर आउटपुट 40 W आहे. कंपनीकडून उत्पादनावर 1 वर्षाची वॉरंटी आहे. Samsung TheWall Luxury 292-inch Ultra HD 8K Smart Micro LED TV Smart TV ची भारतात किंमत तब्बल 88000 रुपये इतकी आहे.

Mi Qled TV

हादेखील Mi चा Android स्मार्ट टीव्ही आहे. त्याचे मॉडेल क्रमांक Xiaomi Mi TV 5 65-इंच अल्ट्रा HD 4K Smart Q LED TV हे आहे. या टीव्हीमध्ये QLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन साईज 65 इंच आहे.

टीव्हीच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 4K, 3840 x 2160 Pixels आहे. तर स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 16:09 आहे. स्मार्ट टीव्ही क्वाड कोअर प्रोसेसरने सुसज्ज आहे. या टीव्हीचे एकूण स्पीकर आउटपुट 40 W इतके आहे.