ताज्या बातम्या

२०२२ मध्ये लग्न करतायचे आहे ?जाणून घ्या शुभ मुहूर्त ..

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- सहसा तुळशीचे लग्न आटोपले की लग्नाचे वारे वाहायला सुरुवात होते, पण १५ डिसेंबर २०२१ पासून मल मासामुळे पुन्हा एकदा विवाहांना ब्रेक लागणार आहे.त्यानंतर २०२२ मध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सनई वाजू लागेल.

जर तुमच्या कुटुंबातही यंदा कर्तव्य असेल तर जाणून घ्या २०२२ च्या सर्व १२ महिन्यांत लग्नासाठी कोणते आणि किती शुभ मुहूर्त आहेत? धर्म आणि ज्योतिष शास्त्राप्रमाणे लग्नासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग सांगितले आहेत.

त्याचप्रमाणे लग्नासाठी शुभ दिवस आणि शुभ तारखाही सांगण्यात आल्या आहेत. या दिवशी आणि तारखांना लग्न करणे खूप शुभ असते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. पती-पत्नीचे भाग्य वाढते.

२०२२ वर्षातील विवाह मुहूर्त

२०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विवाहसोहळ्यांचा मुहूर्त असणार आहे. या दरम्यान ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे महिने राहतील, ज्यामध्ये चातुर्मासामुळे लग्नाचा मुहूर्त नसेल.

जानेवारी २०२२: २२, २३, २४ आणि २५ जानेवारी २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

फेब्रुवारी २०२२: ५,६,७,९,१०,११,१२,१८,१९,२० आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

मार्च २०२२: मार्च २०२२ मध्ये लग्नासाठी फक्त २ शुभ मुहूर्त आहेत. या महिन्याच्या ४ आणि ९ तारखेला लग्न करणे शुभ राहील.

एप्रिल २०२२: १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४ आणि २७ एप्रिल २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

मे २०२२ : मे २०२२ मध्ये २, ३ (अक्षय तृतीया), ९, १०, ११, १२,१५,१७, १८, १९, २०, २१, २६, २७ रोजी लग्न करणे शुभ राहील.

जून २०२२ : जून २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त १, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १७, २३ आणि २४ तारखेला असेल.

जुलै २०२२ : जुलै महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त ४, ६, ७, ८ आणि ९ असेल.

नोव्हेंबर २०२२: नोव्हेंबर २०२२ मध्ये, विवाहासाठी २५, २६, २८ आणि २९ तारखेला शुभ मुहूर्त आहे.

डिसेंबर २०२२ : डिसेंबर २०२२ मध्ये लग्न करण्यासाठी १, २, ४, ७, ८, ९ आणि १४ तारखेला शुभ मुहूर्त असेल. याशिवाय काही शुभ दिवस असतील ज्या दरम्यान अक्षय्य तृतीया सारख्या दिवशी लग्न मुहूर्ताशिवाय करता येईल. ३ मे २०२२ रोजी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न करणं खूप शुभ मानलं जातं.

Ahmednagarlive24 Office