अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण राजस्थान, विदर्भ आणि तेलंगणा या भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, कोकण आणि गोवा, अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ईशान्य भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान पुढील चार दिवस म्हणजेच 22 सप्टेंबरपर्यंत देशासह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल.
तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.