नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मुंबईतील इनशूरन्सचे कार्यालय बंद पाडण्याचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- नगर जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी खरीप 2020 मधील विमा योजनेचा लाभ दिला नाही. विमा हप्ते भरून घेणाऱ्या भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्या मुंबईतील कार्यालय बंद करण्याचे आंदोलन शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी मराठा महासंघाने म्हटले की, नगर जिल्ह्यात खरीप 2020 या हंगामात 4 लाख 66 हजार कंपन्यांनी विविध पिकाचा 2 लाख 59 हजार 448 हेक्‍टरवर विमा उतरवला आहे. त्यापोटी शेतकऱ्याकडून 148 कोटी रुपयांचा हप्ता भरलेला आहे.

तेवढीच रक्कम शासनाकडून विमा कंपनीला गेली आहे. 745 कोटी रुपये यातून संरक्षित झाले आहेत. गेल्या वर्षी खरिपातील राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांनी गतवर्षीच्या खरिपातील विम्याचा लाभ दिला आहे.

नगर जिल्ह्यात मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. गेल्यावर्षी पावसामुळे तसेच नैसर्गिक कारणाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षीच्या खरीपआधी पीक विम्याचा लाभ मिळणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे लाभ का नाकारला जात आहे. याची चौकशी करून कारवाई होणे गरजेचे असताना सरकारी पातळीवरही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून विमा भरून घेऊन विमा लाभ देण्यासाठी विलंब का लावला जात आहे?

याची चौकशी करून संबंधित भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स कं. लि. यांच्यावर दि.१४ जूनपर्यंत राज्य सरकारने कारवाई करावी, अन्यथा दि.१५ जून रोजी भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स कं. लि. यांच्या मुंबई येथील कार्यालय बंद आंदोलन शेतकरी मराठा संघाचे कार्यकर्ते करतील असा इशारा निवेदनात श्री दहातोंडे यांनी दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24