अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील भंडारदरा धरणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरण गुरुवारी 80 टक्के भरले. जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या अंब्रेला फॉलद्वारे 413 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
त्यामुळे आता निळवंडे, भंडारदरा ने पाणी सोडण्यात येत आहे. भंडारदरा धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 29 जुलै 2021 रोजी भंडारदरा धरणाच्या 200 व्हॅाल्व मधून (अंब्रेला फॅाल) द्वारे 413 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉलचा पर्यटकांनी सर्व नियम पाळून आनंद घ्यावा पर्यटकांनी धिंगाणा घालु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ओव्हरफ्लो कालावधीमध्ये सदर विसर्ग सुरू राहिल, असे अहमदनगर पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
दरम्यान 8320 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण 40 टक्कयांवर गेला आहे. या धरणातील पाणीसाठा 3215 दलघफू झाला होता.परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.