कोरोनाची लाट पाहता ; सणोत्सवाबाबत जिल्हाधिकऱ्याने केले आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-देशभरात गेल्या वर्षभरापाससून कोरोनाचा लाट पसरली आहे. यामुळे गेल्या वर्षभरापाससूनच सर्व सण उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, यांवर बंदी घालण्यात आली.

तसेच सर्व सण उत्सव हे नियमांच्या आधीन राहूनच साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नुकतेच जिल्ह्यासह राज्यात करोनाची दुसरी लाट सुरू असल्याने 14 एप्रिल रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

यंदा प्रभातफेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मार्गदर्शन सुचना जारी :- दरवर्षी 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन जयंती साजरी करतात.

पण यांना करोनाची लाट असल्याने अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

या गोष्टींव्ही काळजी घ्या :- प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकाचवेळी 5 पेक्षा जास्त नसावी.

तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सनिटायझर आदी) पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24