जलसंधारणाची कामे राज्यात झाली पण चौकशी फक्त कर्जत तालुक्यातील कामांची सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- विषय कोणताही असो तालुक्यातील आजी माजी नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची तसेच आरोप – प्रत्यारोप हे ठरलेलेच असतात.

यातच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्यामध्ये अनेकदा शीतयुद्ध जुंपलेले आपण पहिले आहे.

यातच आता माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. ‘‘जलसंधारणाची कामे राज्यामध्ये झाली आहेत; पण चौकशी फक्त कर्जत तालुक्यातील कामांची सुरू आहे.

कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे आता सर्वांना लक्षात आले आहे. ते एक दिवस येतात, फोटोसेशन करतात, तेच फोटो दहा-पंधरा दिवस सोशल मीडियावर टाकतात,’’

अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केली. याच अनुषंगाने पुढे बोलताना माजीमंत्री शिंदे म्हणाले कि, आमदार रोहित पवार मी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास घाबरतात काय?

मी गेल्या दीड वर्षात अनेक प्रश्न त्यांना विचारले. मात्र, एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला जनतेसाठीच उत्तर देण्याची जबाबदारी त्यांची आहे.

पुढील काळात तालुक्यातील जनता झालेली चूक नक्कीच दुरुस्त करतील, अशी मला आशा वाटते.

अहमदनगर लाईव्ह 24