आमदार पवारांच्या तालुक्यात पाण्याचे नियोजन कोलमडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सिंगल फेजचे रोहित्र जळाले असल्याने जामखेड तालुक्यातील बांधखडक ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा बंद आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली.

त्यामुळे गावकऱ्यासंमोर कोरोनासह पाणीटंचाईचेही संकट उभे राहिले आहे. सविस्तर माहिती माहिती अशी कि, सातशे लोकसंख्या असलेले बांधखडक गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.

परंतु, सिंगल फेजचे राेहित्र चार महिन्यापूर्वी जळाले. याबाबत ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला, मात्र काही केल्या प्रशासनाकडून रोहित्र मिळेना. ग्रामस्थ एकमेकांना सहकार्य करून बोअर व खासगी विहिरीतून पाणी घेऊन तहान भागवत होते.

मात्र आता कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका पाहता कुणी कुणाकडे पाण्यासाठी जात नाही आहे. यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी 1 किलोमीटर अंतर असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीवर जात आहे.

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एवढी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तात्काळ यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24