Narendra Bhondekar : आम्ही 200 खोकेवाले आमदार, नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्टच सांगितलं…

Narendra Bhondekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून ५० खोक्यांचा आरोप केला जात आहे. तसेच शिंदे गटातील आमदारही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ५० खोक्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. भंडारा जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र भोंडेकर यांनी २०० खोक्यांवर भाष्य केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आमदार, नरेंद्र भोंडेकर म्हणाले, लोकं म्हणतात खोकेवाले आमदार. भंडाऱ्यात असे काही नाही. 50 खोक्यांचा आरोप आमदारांवर लावला जातो. पण, आम्ही 200 खोकेवाले आमदार आहोत.

200 कोटी रुपयांच्या विकासकामाचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळं आम्ही 200 खोकेवाले आमदार आहोत असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले आहे.

नरेंद्र भोंडेकर यांनी पहिल्यांदा आमदार झाल्यावेळीचा किस्सा देखील सांगितला आहे. ते म्हणाले, 2009 आणि 2019 मध्ये आमदार झालो. पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा गावसुद्धा माहीत नव्हते.

आम्ही आंदोलन न्याय मिळण्यासाठी करत होतो. आता काही लोकं स्टंटबाजीसाठी आंदोलन करतात. 2019 मध्ये जिल्हा प्रमुख असूनही मला तिकीट मिळाले नाही. संघटनेत होतो. पण, तिकिटाच्या वेळेत उद्धव ठाकरे यांचा फोन स्वीच ऑफ होता. त्यामुळे अपक्ष उभे राहावे लागले.

पुढे बोलताना भोंडेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती देखील केली आहे. सगळे आमदार, मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. कारण ते आजी-माजी सगळ्यांच्या सोबत असतात. म्हणून माजी आमदार अनिल बावनकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मदत करणे हा शिंदे साहेबांचा स्वभाव आहे.