Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील खासदार आमदार आज पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आज कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही निमंत्रण दिल्याचे शिंदेनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे आणि बाकीचे आमदार आज विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार आहेत. १२ वाजेपर्यंत हे विमान गुवाहाटीला पोहोचणार आहे. तसेच या विमानामध्ये एकूण १८० आहेत. सर्वप्रथम सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे हे देवीचं दर्शन घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाण्याअगोदर माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो.
त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असे वाटत नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.
राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही.