अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- मातंग समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करु. तसेच शहरात लवकरच महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत, त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांचेही पुर्णाकृती पुतळे बसविण्याचा प्रयत्न राहील.
या पुतळ्यांभोवती सुशोभित बगीचा व त्यांचे साहित्यांचे संग्राहलय उभरण्यासाठी सहकार्य करु. सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच मातंग समाजाच्या चाहुराणा बु॥ मोरचुदनगर येथील स्मशानभुमीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी दिले.
मातंग समाजाच्यावतीने नुकतीच महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांची भेट घेऊन त्यांना समाजातील विविध प्रश्नांबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक व माजी मंत्री स्व.बाबुराव भारस्कर यांच्या कन्या सौ.सीता सुर्यवंशी, अॅड.रामदास सुर्यवंशी, विवेक सुर्यवंशी,
माळीवाडा येथील लक्ष्मी माता मंदिराचे मुख्य पुजारी व विश्वस्त पोपटराव साठे, संजय शेंडगे आदि उपस्थित होते. प्रारंभी सौ.सीता सुर्यवंशी यांनी सौ.रोहिणी शेंडगे यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. अॅड. रामदास सुर्यवंशी यांनी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.