अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरा त एम आय डी सी मध्ये श्री इंपेक्स फर्निचर गोडाऊन च्या शेजारी मोकळ्या जागेत वास्तव्यास असलेले व मेंढपाळ म्हणून मजुरीचे काम करणारे श्रावण अहिरे मूळ रहिवासी हिरानगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलाच्या गळ्यावर उजव्या बाजूला गळा दाबल्याच्या खुणा दिसत असल्याने सदर चिमुकल्याचा घात झाल्याची शक्यता प्रथम दर्शनी वर्तविली जात आहे सदर घटना ही आज रोजी भल्या पहाटे घडली असून शेजारील मेंढपाळ तसेच आई-वडिलांनी त्यास श्रीरामपूर येथे उपचारासाठी नेले होते.

परंतु डॉक्टरांनी त्यांस मृत घोषित केले सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षका डॉक्टर दिपाली काळे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप घटनास्थळी दाखल झाले तर सदर घटना नेमकी कशी घडली याविषयी चौकशीसाठी मुलाच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर चिमुकल्या मुलाच्या पश्चात त्याला एक मोठी बहीण व दोन भाऊ व आई-वडील असा परिवार आहे सदर चिमुकल्याच्या घातपाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर परिवार एमआयडीसी परिसरात गेल्या तीन महिन्यापासून वास्तव्यास आहे तर ज्या मालकाच्या मेंढ्या सदर कुटुंब सांभाळत होते तेदेखील शेजारी वास्तव्यास आहे.

दत्तनगर येथील पोलिस चौकीचे कॉन्स्टेबल कारखेले राशिनकर व शेलार राजेंद्र लोंढे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह श्रीरामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे सदर घटना नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24