मदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक ९ एप्रिल शुक्रवारी सायंकाळी ८ वाजेपासून ते दि. १२ एप्रिलसोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.
कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही. जिल्ह्यातील संपूर्ण आस्थापना पूर्ण बंद ठेवाव्यात असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.