अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- शिक्षक हा समाजाचा आरसा आहे, शिक्षण देतांना ते विद्यार्थी नव्हे तर देशाचे सक्षम नागरिक घडविण्याचे काम करत असतात.
प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यावर प्रशासकीय प्रश्न सोडविणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे निवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न प्राधान्यांनी सोडविण्याचा आपण प्रयत्न करु, असे आश्वासन नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिले.
सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाच्यावतीने नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश जाधव, सचिव रोहिदास कांबळे,
उपाध्यक्ष एकनाथ जगताप, खजिनदार बाबूराव चन्ने, कार्यकारिणी सदस्य प्रभाकर खणकर, सुनिल खिस्ती, शाम जोशी, जयराम मगर, दत्तात्रय पानमळकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेवानिवृत्तांची पेन्शन प्रकरणे, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे, रजा रोखीकरण देयके, फरक देयके,
दिवाळीपूर्वी सातव्या वेतन आयोगातील देय दुसरा हप्त देयके पारित करणे. वेतन देयकांतील फरकाची रक्कम मिळावी आदि प्रश्न मांडण्यात आले.
यावेळी अध्यक्ष रमेश जाधव व पदाधिकार्यांशी श्री.कडूस यांनी सविस्तर चर्चा करुन आपले प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. शेवटी सचिव रोहिदास कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.