अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून “त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात घडली.
संबधित महिला कॉन्स्टेबल यांनी याबाबत जिल्हा पोलिस कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याचेविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री कामावर असताना महिला पोलीस कर्मचारी यांचेवर ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून त्या महिला कर्मचारी यांचा हात ओढून जवळ घेऊन मिठी मारली होती.
या घटनेनंतर लगेचच संबंधित पोलिस महीलेनी वरिष्ठांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर आरोपी आघाव याने महिलेची लेखी माफी मागितली.
यापुढे असे करणार नाही असे सांगून महिलेने बदलीची मागणी केली होती. त्यामुळे काही काळ प्रकरण थांबले होते.
मात्र पुन्हा आरोपीने महिलेची छेडछाड केल्याने महिला पोलिस कर्मचारी यांनी तातडीने नगर येथे जाऊन वरिष्ठ यांचेकडे तक्रार करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.त्याप्रमाणे शनिवारी रात्री आरोपी भाऊसाहेब आघाव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.