सुरेगावात नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या युवतीची काढली छेड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- काेपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील युवतीला दमदाटी करून तिची छेड काढून तिच्यावर अितप्रसंग करण्यात आला.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

की, १४ मे रोजी रोजी गोदावरी नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती.त्यावेळी तिला एकटी पाहून विजय चंदू जिरे याने तिला दमदाटी करुन बळजबरीने हात धरुन काटवनात घेऊन गेला व तेथे मारहाण केली

व तिचेवर अतिप्रसंग केला. या प्रकरणी आरोपी विजय विरोधात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24