…बछड्यांचा फोटो काढायला गेले आणि बिबट्या मादीने डरकाळी फोडली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव शिवारात ऊस प्लाटमध्ये सरी लोटण्याचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान काहीजण या बछड्यांचे फोटो घेत असताना बिबट्या मादीच्या डरकाळीचा आवाज आला.

हा आवाज ऐकताच शेतातील मजुर तेथून पळून गेले. दरम्यान माळवाडगाव येथील कार्यकर्त्यांना घटनेची माहिती देताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागास घटनेची तातडीने खबर देण्यात आली.

ऊस पट्ट्याकडे कुणीही जाऊ नका, अशा सूचना दिल्या. कारण बिबट्या मादी बछड्यांना सोडून पलायन करत नाही. आज संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून पिंजरा बसविण्यात येईल, असे असे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

मात्र परिसरातील शेतकऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahmednagarlive24 Office