शेतीवर मोटार चालू करण्यासाठी गेले आणि समोरील चित्र पाहून धक्काच बसला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-शेतीतील विहिरीवरील ५ अश्वशक्ती पाणबुडी तसेच शेजारील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीला गेल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घडली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेतकरी संजय वक्ते यांनी नेहमीप्रमाणे शेतात जाऊन इलेक्ट्रॉनिक मोटरीने शेतीला पाणी भरले व सहा वाजता काम संपवून मोटर बंद करून घरी गेले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता मोटरीचे टाईप फुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना इलेक्ट्रिक मोटार कोणीतरी चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले.

संजय वक्ते यांनी याबाबत आजूबाजूस चौकशी केली असता शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या देखील इलेक्ट्रिक मोटारीची चोरी झाल्याचे समजले.

या घटनेची माहिती कोपरगाव शहरी पोलीस ठाण्यास देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office