अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- उसाचे नुकसान करू नये म्हणून उसाच्या शेतात डुकरासाठी लावलेल्या वीज प्रवाह असलेल्या तारेला चिकटुन एकाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे घडली. खड्या रामु चव्हाण असे त्या मृत इसमाचे नाव आहे.
रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने तब्बल दोन दिवसानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी गोपाळ रायभान भोसले याच्या तक्रारीवरुनसंबंधीत शेतकऱ्यावर गुन्हा नोंदविला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, नवनाथ गर्जे (रा. पाडळी) यांचे पाडळी शिवारात उसाचे शेत आहे.
तेथे रानडुकरे उसाचे नुकसान करतात म्हणुन त्यांनी शेताच्या बांधावर तार लावली होती.त्यामधे विजेचा करंट सोडलेला होता. खड्या चव्हाण शिकारीला शेतामधे गेला होता.
तेथे गेला त्याचा पाय तारेचा चिकटला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला. खुड्याचा मोहुणा गोपाळ भोसलेने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.
पंचनामा केला. याबाबत रामेश्वर कायंदे हे अधिक तपास करीत आहेत. पाडळी शिवारातील या घटनेमुळे चव्हाण मयत झाला आहे. व शेतकरी नवनाथ गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.