Sugarcane Sludge : वही रुतबा बरकरार है! पश्चिम महाराष्ट्र ठरला सर्वाधिक ऊस गाळपाचा मानकरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यात सर्वत्र या ऊस गाळप (Sugarcane Sludge) हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे.

उसाच्या लागवडीत (Sugarcane Farming) वाढ झाल्याने आणि अपेक्षित उत्पादन मिळाल्याने यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न शेतकऱ्याच्या बांधपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

आता गाळप हंगाम सुरु होऊन सुमारे सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे मात्र अजूनही अनेकांचा ऊस फडातच आहे. मात्र असे असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Growers) आनंदाची पर्वणी आहे.

कारण की पश्चिम महाराष्ट्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न तुलनेने कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी (Sugar Factory) सुयोग्य नियोजन आणि नोंदणीनुसार ऊसतोड केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला असून अतिरिक्त उसाचा प्रश्न एवढा चिघळला नाही.

यामुळे येथील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळल्याचे सांगितले जातं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेला आणि देशातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेणारा साखर कारखाना अर्थात विठ्ठलरावं शिंदे यावर्षी देखील शीर्षस्‍थानी विराजमान आहे.

या साखर कारखान्यात या गळीत हंगामात विक्रमी ऊसाचे गाळप झाले आहे एवढेच नाही तर आपल्या कार्यक्षेत्रातील उसाशिवाय परिसरातील देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एक ऊस देखील शिल्लक राहू देणार नाही असं कारखान्याचे चेअरमन आणि आमदार बबनरावं शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

बबनराव यांनी सांगितले की, ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी देखील सर्व उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडल्या शिवाय कारखान्याचे धुराडे बंद केले जाणार नाहीत. यामुळे निश्चितचं पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

माढा येथे विक्रमी गाळप सोलापूर येथील माढा तालुक्यात विठ्ठलरावं शिंदे साखर कारखान्याचे दोन युनिट आहेत. यावर्षी मुळातचं अधिक ऊसाचे उत्पादन असल्याने विक्रमी गाळप ठरलेले होते आणि झालं देखील तसंच माढा तालुक्यातील पिंपळनेर आणि कुर्डुवाडी येथील साखर कारखान्यात जवळपास 30 लाख मेट्रिक टन साखर उत्पादीत झाली आहे. यामुळे या परिसरातील ऊस उत्पादकांचा मोठा फायदा झाला असून होणारे नुकसान टळले आहे.

एकीकडे मराठवाड्यात साखर कारखानदार शेतकऱ्यांनां वाऱ्यावर सोडत आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात मात्र परिस्थिती याउलट आहे.

आपल्या कार्यक्षेत्रातील सभासदांचे ऊस गाळप करून येथील कारखाने लगतच्या ऊस उत्पादकांचा ऊस देखील गाळप करीत आहेत.

यामुळे पश्चिम महाराष्ट्रमधील कारखानदारांनी एक वेगळा आदर्श रोवला असल्याच्या प्रतिक्रिया आता झळकु लागल्या आहेत.

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात प्रशासन समवेत लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याने या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न सर्वत्र पेटला असला तरी याची झळ पश्चिम महाराष्ट्राला बसली नाही.