अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परीसरात कोरोनाची भिती असतानाच आता जादूटोण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्राहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात, अशा घटना पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव,
वृद्धेश्वर कारखाना परीसरात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने घडत आहेत. एकविसाव्या शतकात आज अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. कासार पिंपळगाव-आदिनाथनगर रस्त्यावर जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत.
काही ग्रामस्थाच्या घरासमोर एक अज्ञात व्यक्ती राञी अपराञी येऊन लिंबू, मिरच्या, टाचण्या, भाकरी, अंडी, कुंकू याचे गाठोडे बांधून ठेवत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.
यामुळे हा प्रकार सकाळी पाहील्यावर लहान मुले,महिला घाबरत आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्ती जाणीवपूर्वक असा प्रकार करत असल्याचे जाणवत आहे. अमावस्या, पौर्णिमा किंवा ग्राहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना आहेत.
काही ग्रामस्थांना अनेक ठिकाणी घरासमोर काही मिरच्या आणि मीठ असल्याचे समोर आले असून हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा असून याची पोलिसांनी गंभीर दखल घेत कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.