अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी नुकतेच हैद्राबाद येथून पकडण्यात आले आहे.
मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा बोठे पुन्हा दुसऱ्या राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याच पूर्वी त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
बोठे हा हैद्राबादमधील दिलसूकनगर परिसरात पेईंगगेस्ट म्हणून राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्याठिकाणी हजारो लोक अशाच पद्धतीने राहतात. त्यामुळे बोठेला शोधून अटक करण्याचे मोठे आव्हान होते.
पोलीस त्याठिकाणी पोहोचले पण बोठेने पोलिसांना चकवा दिला. यानंतर पोलीस हतबल न होता शोध मोहीम सुरू ठेवली. पोलिसांनी बोठेला मदत करणार्या तिघांना उचलले. याची कुणकुण वकील जनार्दन व बोठेला लागली होती.
त्यांनी बिलानगरमधील एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी आश्रय घेतला. तो मुस्लिम व्यक्ती त्या वकिलाचा मित्र होता. वकील जनार्दन बोठेला मदत करत असल्याचे पोलिसांना पुराव्यानिशी माहिती झाले.
पोलिसांनी वकील जनार्दनच्या मुसक्या आवळल्या. आपल्याला साथ देणारे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात असल्याने बोठे लपण्यासाठी हॉटेलमध्ये जाऊन लागला व तो पोलिसांना चकवा देतच राहिला.
तीन वेळा चकवा देणारा बोठेला पोलीस मागावर असल्याचे कळल्याने तो भोपाळला पळून जाणार होता. पुढच्या दोन तासात तो हैदराबाद सोडणार होता.
तोच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले आणि बोठेचे पुढचे नियोजन फसले. बोठेने हैदराबाद सोडले असते तर तो सापडणे अवघड झाले असते.