किडनी स्टोन होण्याची कारणे कोणती, त्यावर उपाय काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- किडनी रक्‍त शुद्ध करते, पण जेव्हा स्टोनचे छोटे छोटे कण किडनीमध्ये जमा होऊ लागतात, तेव्हा रक्‍त गाळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.

यामुळे काही काळाने याचा स्टोन निर्माण होतो. छोट्या आकारातील स्टोन पुरेसं पाणी पिण्याने लघवीच्या मार्गे स्वतः निघून जातात, पण मोठ्या आकाराचे स्टोन मात्र मूत्रमार्गात अडथळा निर्माण करतात. या पाच प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्या

१. किडनीमध्ये स्टोन ची कारणं काय? – कमी पाणी पिणे, लघवी रोखणे, जास्त मीठ-साखर, अल्कोहोलमुळे स्टोन होतात. याचं प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये दुप्पट असते. आक्सलेट फास्फेट किंवा कार्बोनेटनी कॅल्शियम पिळून स्टोनची निर्मिती होते.

२. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्टोन का निर्माण होतो? – शरीरात ड जीवनसत्त्व कॅल्शियम शोषून घेते. याची कमतरता निर्माण झाल्यास हे किडनीच्या आजूबाजूला जमा होते. यामुळे लघवीमध्ये बाधा निर्माण होते. यामध्ये असणारे लवण एकत्र होऊन स्टोन तयार होतो.

३. कमी पाणी पिल्याने समस्या होते का? – खूप वेळ उन्हात काम करण्याने शरीरातील पाणी कमी होते. यामुळे लघवीद्वारे विषारी पदार्थ शरीराबाहेर पडू शकत नाहीत. म्हणून पाणी भरपूर प्रमाणात पिणे गरजेचे आहे. शारीरिक श्रमाची कमतरता, चहा-कॉफी पिण्याने अधिक पिण्याने ही समस्या होऊ शकते.

४. अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना स्टोनची समस्या का होते? – असे रुण एका जागी अंथरुणावर पडून असल्याने हाडांचं क्षरण होते. पैरा थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय होण्याने युरिन मधून कॅल्शियमचे प्रमाण वाढण्याने स्टोन होतो.

५. वेदना होत नसल्यास – काही वेळेस स्टोन्स किडनीमध्ये दीर्घकाळ पडून असतात. वेदना होत नाहीत, पण किडनीच्या नैसर्गिक प्रक्रियेवर मात्र प्रभाव पडतो. जेव्हा अन्य आजारांसाठी तपासणी केली जाते तेव्हा सोनोग्राफीदरम्यान किडणीतील स्टोन दिसतात.

आंबट पदार्थ खाणे फायदेशीर : – आहारात सायट्रिक असिडने समृद्ध पदार्थांचा समावेश करा. आंबट पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक असिड असते. म्हणजे लिंबू, आवळा, संत्री इत्यादी. कॅल्शियम ऑक्सलेट मुळे किडनी स्टोन तयार होतो. जेव्हा कॅल्शियम ऑक्सिलेटबरोबर मिसळतो, तेव्हा किडनीमध्ये स्टोन वाढण्यास सुरुवात होते.

आपण पुरेशा प्रमाणात सायट्रिक असिडचं सेवन केलं, तर यापासून बचाव होतो. गाजर, जवस, मका, कारलं, ओट्स यामध्ये अधिक खनिजं पदार्थ असतात. यांचं सेवन करायला हवं. पाणी आणि ताक यांचं सेवन अधिक करण्यानेही छोटे स्टोन आपोआप निघून जातात.