अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग २९ व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाहीये. तसेच आज अमृत दिन महोत्सवी सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
परंतु तमिळनाडूमध्ये ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तमिळनाडू राज्य सरकारने यावर लागणाऱ्या टॅक्सवर ३ रुपये प्रति लीटरची कपात केली आहे.
तमिळनाडूचे अर्थमंत्री पी त्याग राजनने राज्याच्या अर्थसंकल्पात या कपातीची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०७.८३ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ९७.४५ रुपये प्रति लीटर आहेत.
तमिळनाडू सरकारने उचललेल्या या पावलानंतर दुसऱ्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर लागणारा टॅक्स कमी होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये शेवटचे दर बदलले होते. १८ जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.
शेवटी पेट्रोलचे दर १७ जुलै रोजी वधारले होते.दरम्यान, दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. तसेच नवीन दर सकाळी ६वाजल्यापासून लागू होतात.