खरेदीसाठी काय आहेत सोन्या – चांदीचे दर? जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-गेल्या अनेक दिवसांपासून सोने – चांदीच्या दरात चांगलेच चढउतार पाहायला मिळतो आहे. यातच कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर हालचालींना वेग आला आहे.

याचाच परिणाम बाजारावर होत आहे. दरम्यान आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 191 रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदीत प्रतिकिलो 1062 रुपयांनी घसरण झालीय.

घसरणीनंतर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 46283 रुपये आणि चांदी 67795 रुपये प्रतिकिलो होती.

मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर दहा ग्रॅम 46474 रुपये आणि चांदी 68857 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24