ताज्या बातम्या

MLA Salary : राज्यातील आमदारांना किती पगार मिळतो ? निवडणूक हरले तरी किती पेन्शन मिळते ? वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर

Published by
Ahmednagarlive24 Office

MLA Salary : सर्वसामान्य नोकरदार, कर्मचारी वर्ग जसे प्रत्येक महिन्याला पैसे कमावतात. तसेच राजकीय लोकप्रतिनीधीही प्रत्येक महिन्याला पैसे कमावतात. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

तुम्ही निवडून दिलेल्या सर्व आमदारांना प्रत्येक महिन्याला पगार दिला जातो. त्यांनी 5 वर्ष काम केलं तरी त्यांना आयुष्यभराची पेन्शन सुरु होते. सध्या कर्मचारी जुनी पेन्शन पुन्हा सुरु करावी यासाठी आंदोलन करत आहेत. अशातच आता आमदारांना किती पगार आणि पेन्शन मिळते असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

महाराष्ट्र्रातील इतक्या आमदारांना पेन्शन दिली जाते तेव्हा राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही. परंतु, आम्हाला पेन्शन देण्याची वेळ येते तेव्हा सरकार आर्थिक कारण पुढे करते. या आमदारांना पेन्शन देण्यास सरकारकडे पैसे आहेत.

राज्यात येणाऱ्या सर्व नैसर्गिक, आरोग्य आपत्तीत कर्मचारी वर्ग आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. तरीही आम्हाला पेन्शन देताना सरकार मागे पुढे का पाहते? अशी संतप्त प्रतिक्रिया सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान एका चॅनलशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. परंतु, जुनी पेन्शन योजना राज्यात लागू केली तर सरकारच्या तिजोरीवर याचा ताण येईल असे सरकारचे मत आहे. अशातच आता या कर्मचाऱ्यांनी राज्यातील आमदारांच्या पेन्शनवर प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान राज्यातील आमदारांना पगार आणि पेन्शन किती असते जाणून घेऊयात सविस्तर.

इतका असतो पगार

राज्यातील सर्व आमदारांना राज्य सरकारच्या नियमानुसार पगार, भत्ता, सुविधा तसेच इतर सवलती दिल्या जातात. प्रत्येक महिन्याला आमदारांना किमान 1 लाख 82 हजार 200 रुपये पगार असतो. पगारशिवाय इतर अनेक सुविधा सरकार कडून देण्यात येतात. ही सर्व माहिती विधिमंडळातील एका उच्च अधिकाऱ्याने दिली आहे.

भत्ता किती असतो?

  • टेलिफोनसाठी – 8 हजार रुपये
  • स्टेशनरीसाठी – 10 हजार रुपये
  • संगणकसाठी – 10 हजार रुपये

त्यामुळे राज्यातील एका आमदाराला महिन्याला जवळपास 2 लाख 41 हजार 174 रुपये एवढा भत्ता आणि पगार देण्यात येतो.

आपण आमदारांचे पगार पाहिले, आता जाणून घेऊयात आमदारांना मिळणारे निवृत्तीवेतन –

निवडणूक हरले तरी किती पेन्शन मिळते ? वाचा

Ahmednagarlive24 Office