file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- जेथे पाऊस जास्त असतो अशा भागात राहात असाल तर शॉर्ट ड्रेरेसेस सोबत लांब रबरी बूट्स घाला. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात खूप दिलासा मिळतो, पण चिखल व पाण्यामुळे कपडे खराब होण्याची भीती रोजच असते.

अशावेळी पावसाळ्यात कोणते कपडे घातल्यामुळे आपण कंफर्टेबल राहाल व स्टायलिश दिसाल ते जाणून घेऊया.

१. रंग :- व्हाइट व लाइट शेड्स आत ठेवून द्या. निऑन, आरैंज, सनी यलो, पिंक आणि ब्ल्यू कपडे बाहेर काढा. पुरुष ऑलिव्ह ऑइल ग्रीन वा ब्राउन लोअर्स वापरू शकतात तर अपर बॉडीसाठी फेंट रंग निवडावा. लाइट शेड जीन्स व ट्राउझर ऑव्हाइड करा. ‘आउट ऑफ द बॉक्स ‘ ब्राइट कलर्स परिधान करा.

२. फॅब्रिक :- पावसाळ्यात शिफॉन आणि सिल्क ऑँव्हाइड करा. कॉटन, लिनन, सिंथेटिक वापरू शकता. सी-थ्रू वा ट्रान्सपरंट कपडे घालणे टाळावे. प्रिंटेड फॅब्रिक पावसाळ्यात चांगले दिसतात. झिग-झॅग, लाइन्स वा ऑफ बीट प्रिंट फॅब्रिक वापरावे .

३. लेअरिंग :- पावसाळ्यात इंडियन फॅशन इंडस्ट्री शॉर्ट लोअर्स वा हाय वेस्ट पँट्स प्रमोट करतात. मिनी स्कर्ट, बॉडी कॉन ड्रेस वा हाय वेस्ट पँट्स वापरू शकता. पुरुष बर्मुडा शॉर्टस व केप्रीज वापरू शकतात. टाइट फिटिंग ट्राऊझर ऑव्हाइड करा.

४. कंफर्ट :- नी-लेंग्थ गाऊन वापरा, फिटेड ड्रेस अव्हॉइड करा. फेंट फॅब्रिकचे शॉर्ट ड्रेसेस, कॉटन केप्रीज, हाफ जंप सूट वा नी-लेंग्थ स्कर्ट वापरू शकता. पुरूष व्हायब्रंट शेडचे टी शर्ट वा सेल कॉटन शर्ट वापरू शकतात.

५. कोऑर्डिनेट :- टी-शर्ट सोबत क्यूलॉट्स वापरू शकता. जुन्या व्हिंटेज रेनकोटऐवजी वॉटरप्रूफ हुडीज, जॅकेट्स व ट्रेंच कोट वापरू शकतात. पावसाळ्यात गारवा जाणवत असेल तर फुल स्लीव्ह हुडी वा क्रॉप्ड हुडी वापरू शकता.

६. फुटवेअर :- जेथे पाऊस जास्त असतो अशा भागात राहात असाल तर शॉर्ट ड्रेसेससोबत लांब रबरी बूट्स घाला. शॉर्ट सोबत स्नीकर्स वा फ्लिप-फ्लॉप वापरा. पुरुष फ्लिप-फ्लॉप, सँडल, अँकल लेथ बूट घालू शकतात.