अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-आजपर्यंत आपण अनेक भितीदायक वस्तु अथवा ठिकाणांबद्दल ऐकले असेल.मात्र, एखादा फोन नंबर भितीदायक आहे असे कुणी तुम्हाला सांगीतले तर? अशाच एका फोन नंबरविषयी भीती पसरली.
कारण हा नंबर वापरणारे तीन जण लागोपाठ मृत्युमुखी पडले होते.यामुळे हा मोबाईल नंबर खुनी नंबर म्हणून ओळखला जाऊ लागला.
या फोन नंबर बाबत सगल दहा वर्ष असा भितीदायक अनुभव आला. बल्गेरियातील मोबीटेल नावाच्या कंपनीच्या CEO ने 0888888888 हा फोन नंबर घेतला होता.
यानंतर हा नंबर वापरणाऱ्या व्लादमीर गेसनोव नावाच्या व्यक्तीचे कर्करोगामुळे निधन झाले. मात्र, काही दिवसांनी त्याचा मृत्यू कर्करोगामुळे नाही तर काही तरी विचित्र कारणामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
त्यानंतर 2003 मध्ये डिमेत्रोव नावाच्या एका कुख्यात ड्रग माफियाकडे हा नंबर आला.यानंतर काही दिवसांतच त्यांची हत्या झाली. डिमेत्रोवनंतर बल्गारियाच्या डिसलिव नावाच्या व्यापाऱ्याने 2005 मध्ये हा नंबर खरेदी केला.
यानंतर विचित्र योगायोगाने त्याच्या काही दिवसातच त्याची देखील हत्या झाली.सलग तीन जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हा फोन नंबरच भीषण रहस्यमयी असावा अशी चर्चा रंगू लागली.
या नंबरमुळेच या तिघांचा असा मृत्यू ओढवला, अशी अफवाही पसरली. कंपनीने अखेर हा नंबर बंद करून टाकला आणि या चर्चांवर पूर्ण विराम दिला.