अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा एका व्यक्तीने केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
नाशिकमधील एका 71 वर्षीय वयोवृद्धाने हा दावा केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
9 मार्च रोजी जुन्या सिडको परिसरात राहणाऱ्या अरविंद सोनार यांनी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात 2 जूनला कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता.
लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, असे अरविंद सोनार यांनी सांगितले.
त्यानंतर काल (9 जून) त्यांच्या मुलाने इंटरनेटवर लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा एक प्रकार बघितला.
यावेळी आपल्या वडिलांमध्ये देखील चुंबकत्व संचारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर स्टीलच्या वस्तू लावल्या आणि त्या चिकटल्या, असे अरविंद सोनार यांनी सांगितले.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही हा संशोधनचा विषय असल्याचं सांगितलं आहे.
लस घेतल्यानंतर वस्तू चिकटत असल्याचा दावा डॉ थोरात यांनी फेटाळून लावला आहे. सदर इसमाची तपासणी करत तज्ञ मंडळींकडून अहवाल मागवण्यात आला आहे.